आजकाल लोकांना आपल्या उत्पादनात किंवा किमान जाहिरातीततरी काहीतरी वेगळं पाहिजे असतं. पण या स्वभावाला 'आजकाल'चं नावही देण्याची तितकी गरज नाही म्हणा. एक संस्कृत सुभाषित म्हणतंही "भांडी फोडतील, कपडे फाडतील किंवा वेळ आली तर गाढवावर बसतील, पण प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करतील". अगदी खरं आहे. असंच प्रसिद्ध होण्यासाठी एका कंपनीनं माणसाच्या रक्ताचा थेंब घालून बनवलेले 'सैतानाचे बूट' तयार केले आहेत. आता का? हा प्रश्नच तसा निकालात निघतो, आणि तसाही या सैतानी बुटांनी कंपनीला पण जरा इंगाच दाखवला. म्हणूनच मग आता नक्की प्रकरण काय घडलंय हे आज इथं जाणून घ्या..
मानवी रक्ताचा वापर करून तयार केलेले बूट....नायकीने त्यांच्यावर खटला का दाखल केलाय?


ब्रुकलिनमधल्या MSCHF या कंपनीने ‘Satan shoes’ म्हणजे सैतानाचे बूट तयार केले आहेत. नावावरूनच तुम्हाला वेगळेपण दिसून येईल. जरा काही हटके बनवायच्या दृष्टीने त्यांनी हे बूट बनवले होते. त्याला सैतानाचे बूट का म्हणतात याला दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे या बुटांच्या सोलमध्ये मानवी रक्त घालण्यात आलं होतं. हे रक्त कंपनीच्या ६ कर्मचाऱ्यांच आहे. प्रत्येक बुटासाठी एक थेंब वापरण्यात आला होता. दुसरं कारण म्हणजे बायबलमधली सैतानाशी जोडलेल्या ओळी दर्शवणारे 'ल्युक १०:१८' हे शब्द बुटावर लिहिण्यात आले होते. याखेरीज बुटांवर उलटा क्रॉस, पेंटाग्रामच्या खुणा होत्या.
या बुटांची किंमत १,०१८डॉलर्स म्हणजे अंदाजे ७५,००० रुपये इतकी आहे. त्यानी अश्या ६६६ जोड्या तयार केल्या आहेत. प्रसिद्ध रॅपर लिल नॅस एक्स याने या बुटांची जाहिरात केली होती. २९ मार्च MSCHF ने हे बूट बाजारात आणले आणि अवघ्या काही मिनिटांत ते विकलेही गेले. शेवटी फक्त १ जोडी शिल्लक होती.

आता गोष्ट अशी आहे की या विरोधात बूट बनवणारी अग्रगण्य नायकी कंपनीने तक्रार केली आहे आणि या सैतानाच्या बुटांवर बंदी देखील आणली आहे. नायकीने दावा केला की त्यांच्या ‘मॅक्स ९७s’ या बुटांच्या डिझाईनमध्ये बदल करून हे नवीन बूट बनवण्यात आले आहेत. त्यामूळे नायकीनेच हे रक्ताचे सैतानी बूट आणले आहेत, अशी चुकीची माहिती पसरली. त्यामूळे कंपनीच्या ब्रँडला धक्का पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली.
नायकीने कायद्याचा आधार घेण्यापूर्वी धार्मिक विचारसरणीच्या अनेक लोकांनी या सैतानी बुटांवर आक्षेप घेतला होता. नायकीचे बूट आहेत असे समजून अनेकांनी नायकीवर बहिष्कार घालण्याचे जाहीरही केले. अनेक मिम्सही व्हायरल होत होते. अखेर नायकी कंपनीने हा खटला जिंकला आणि हे उत्पादन थांबवण्यात आले आहे.
आता सध्या MSCHFने जाहीर केले की हे बूट परत बाजारात येणार नाहीत. पण अवघ्या २ मिनिटांत विकले गेलेलं हे सैतानी बूट मात्र अनेक जणांना चकित करून गेले.
लेखिका: शीतल दरंदळे
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१