ट्रॅक्टर सोडले तर सहसा प्रत्येक वाहनाचे सर्व टायर्स हे सारख्याच आकाराचे असतात. पण ट्रॅक्टरची पुढची चाके लहान आणि मागची चाके मोठी असतात. असे का असते? याच प्रश्नाचं उत्तर आम्ही आज आज आम्ही सांगणार आहोत.
कुठल्याही ट्रॅक्टरच्या इंजिनची क्षमता ही कार्सच्या तुलनेत दोन तृतीयांश असते. तसेच ट्रॅक्टरमध्ये चाकांना फिरवण्याची क्षमता दीड पट असते. गियरच्या मदतीने ट्रॅक्टरचा स्पीड कमी करून अधिक ट्रॅक्शन किंवा टार्क तयार केले जाते. हे टार्क ट्रॅक्टरमध्ये वजन ओढण्याचे काम करत असते. याच कारणाने या वाहनाला ट्रॅक्टर हे नाव पडले आहे.






