आपण जन्माला येताच आपल्याला जात आणि धर्म चिकटतो. फारच कमी लोक असे असतात जे जात आणि धर्माचा रकाना रिकामा ठेवतात. आज आपण एका अशा महिलेला भेटणार आहोत जिने फक्त जात आणि धर्मच लावणं सोडलेलंच नाही, तर भारतातलं पाहिलं ‘No Caste, No Religion’ सर्टिफिकेट मिळवलं आहे.
भारतातली पहिली जात आणि धर्म नाही असं सर्टिफिकेट मिळवणारी बाई, कोण आहेत या?


तिरुपत्तुर, वेल्लोर येथील स्नेहा यांनी हे सर्टिफिकेट मिळवलं आहे. स्नेहा या स्वतः वकील आहेत. बालपणापासून त्यांच्या आईवडिलांनी जन्माच्या दाखला असो किंवा शाळेतील नाव नोंदणी किंवा इतर कागदपत्रांवर जात-धर्म नोंदवलेला नाही. आईवडिलांचे हेच संस्कार स्नेहा यांनी आत्मसात केले आहेत. त्यांनी आपल्या मुलांच्या कोणत्याच कागदपत्रांवर जात धर्म नोंदवलेला नाही. त्यांची ओळख ‘भारतीय’ अशी आहे.

मंडळी, एखाद्याने जात आणि धर्म न लिहिण्याचं ठरवलं तरी हे सहज शक्य नाही. कारण काही कागदपत्रांमध्ये जात-धर्म लिहिणं बंधनकारक असतं. हेच लक्षात घेऊन स्नेहा यांनी एक पाऊल पुढे जायचं ठरवलं. ‘जात आणि धर्म नसलेला’ या सर्टिफिकेटसाठी त्यांनी अर्ज केला. हे वर्ष होतं २०१०.
तुम्हाला कल्पना आलीच असेल की हे सर्टिफिकेट मिळवणं सोप्पं नव्हतं. समस्या लोकांच्या विरोधाची नव्हती, तर समस्या होती या प्रकारचं सर्टिफिकेट यापूर्वी कधीच कोणी मागितलं नव्हतं. शेवटी अशाही प्रकारचं सर्टिफिकेट मिळू शकतं हे सिद्ध झालं आहे. यासाठी स्नेहा यांनी सरकारपुढे आपली बाजू खंबीरपणे मांडली आहे.

मंडळी, जातीचे सर्टिफिकेट आपण सगळ्यांनीच पहिले असतील, पण जात नसलेल्या सर्टिफिकेटची ही पहिलीच वेळ आहे.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१