मिष्टान्न सगळ्यांनाच आवडतात मग त्यात आईसक्रीम तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रसिद्ध आहेत. या आठवड्यात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला असला तरी नुसत्या आईस्क्रीमच्या नावाने मनाला जो थंडावा जाणवेल त्याला तोड नाही. लहानपणच्या रस्त्यावरच्या कुल्फीपासून पंचतारांकित आईस्क्रीमपर्यंत , प्र्त्येकाचं आपल्या आयुष्यात वेगळंच स्थान आहे.
तुम्हाला कदाचित माहित नसेल की जगात अशीही काही आईस्क्रीम्स आहेत जी सर्वात महागडी मानली जातात. त्यातीलच निवडक १० ची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. अर्थातच ही परदेशातली उत्पादनं असल्यानं किंमती डॉलर्समध्ये आहेत. पण रूपयांतच इतक्या किमती असतील तर आणखी ६५रूपयांनी गुणल्यावर किती? आहे की नाही डोक्याला थोडंसं खाद्य? पाहूयात मग देशोदेशीची सर्वात महाग आईस्क्रीम्स..














