कोणत्याही देशासाठी अंतराळ संशोधन महत्वाचं असतं. त्यासाठी दरवर्षी कोटीच्या कोटी पैसा खर्च केला जातो. याची सुरुवात झाली ती दुसऱ्या महायुद्धानंतर. याला कारण होतं शीतयुद्ध. दुसऱ्या महायुद्धातून दोन महासत्ता जन्मल्या - अमेरिका आणि रशिया! दोघांनाही एकमेव महासत्ता बनायचं होतं. त्यासाठी युद्धानंतर दोघांमधल्या छुप्या युद्धाला सुरुवात झाली. त्यालाच शीतयुद्ध म्हणतात.
या शीतयुद्धात अमेरिका आणि रशिया यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी जे जे काही केलं, त्यात अंतराळ मोहिमांचाही समावेश होतो. रशियाने अंतराळात पहिला माणूस पाठवला, तर अमेरिकेने चंद्रावर पहिला माणूस पाठवला. कितीही स्पर्धा असली तरी माणसाला लगेचच अंतराळात पाठवणे शक्य नव्हते. प्रयोग म्हणून आधी प्राण्यांना पाठवण्यात आलं. हे प्राणी एक प्रकारे मृत्युच्या दाढेत ढकलेले गेले होते. सुदैवाने त्यातले काही सुखरूप परतले. त्यांच्यामुळे शक्य झालेल्या अभ्यासाच्या जोरावर आज आपण अवकाशात संशोधन करू शकलो.
आज आपण अवकाशात पाठवलेल्या १० प्रमुख प्राण्यांबद्दल जाणून घेणार आहोत.













