आज बोभाटाच्या बागेत आम्ही एका फळाची ओळख करून देतो आहोत ज्याला शहरीकरणाच्या बाजारात फारसे कोणी ओळखत नाही.
बोभाटाची बाग भाग ७- लिंबू, संत्रं, मोसंबं या सगळ्यांचा मोठा दादा - म्हाळुंग !!


सोबतच्या फोटोत दिसणारे फळ बघीतलेत का ?ईडलिंबासारखं दिसतंय पण ईडलिंबू नव्हे हे आधीच सांगीतलेलं बरं ! एखाद्या कोल्हापूरच्या मित्राला विचारा तो ताबडतोब सांगेल की हे आहे म्हाळुंग ! आता हे सांगायला कोल्हापूरकरच का हवा तर करविरनिवासी अंबाबाईच्या उजव्या हातात हे फळ आहे. या फळाला एक धार्मिक महत्व आहे. अंबाबाईच्या हातात म्हाळुंग दिसेल हे तर सांगीतलंच तसंच एखाद्या यहुदी मित्राच्या घरी गेलात तर देवाचे आभार मानण्यासाठी जी चार फळं अर्पण करतात त्यात एक म्हाळुंगाचं फळ असतं. बुध्द मंदीरात पण तुम्हाला हे अर्पण केलेलं दिसेल.

म्हाळुंग लिंबू संत्रं, यांच्या भावकीतलंच फळ आहे. शास्त्रीय परिभाषेत त्याला Citrus medica म्हणतात. मेडीका म्हटल्यावर त्याचा उपयोग औषधात होतो हे सांगायलाच नको. आकाराच्या मानाने गर फारच कमी असतो पण त्याची भरपाई त्यात असलेल्या औषधी गुणधर्माने भरून काढली आहे. तोंडाची चव परत येण्यासाठी, मळमळ कमी करण्यासाठी, स्त्रीयांच्या काही आजारपणासाठी या फळाच उपयोग होतो. सर्पदंश , वृश्चिकदंश यावर हे फळ उपयुक्त आहे. या फळाची व्यापारी लागवड फारशी केली जात नाही. त्यामुळे या फळाची ओळख नव्या पिढीला लगेच पटणार नाही. दुसरं असं की जागतिकीकरणानंतर बाहेरच्या देशातील इतकी वेगवेगळी फळं बाजारात येत आहेत की या गावाकडल्या म्हाळुंगाला सर्वचजण विसरले आहेत.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१