आज रंगणार आयपीएल २०२२ स्पर्धेचा पहिला सामना, अशी आहे 'बोभाटा' ची ड्रीम ११ टीम

आज रंगणार आयपीएल २०२२ स्पर्धेचा पहिला सामना, अशी आहे 'बोभाटा' ची ड्रीम ११ टीम

गेल्या कित्येक दिवसांपासून क्रिकेट चाहते आयपीएल स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. या स्पर्धेला आजपासून (२६ मार्च) प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिलीच लढत गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हे दोन्ही संघ आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमने सामने आले होते, या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली होती.

या दोन्ही संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर हे दोन्ही संघ २६ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यामध्ये १७ वेळेस चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारली आहे. तर ८ वेळेस कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी श्रेयस अय्यरच्या हाती असणार आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद एमएस धोनीकडे नव्हे तर रवींद्र जडेजाकडे असणार आहे.

अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११

चेन्नई सुपर किंग्ज :

रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, मिचेल सँटनर, ड्वेन ब्रावो, ॲडम मिल्ने, केएम आसिफ, ख्रिस जॉर्डन

कोलकाता नाईट रायडर्स :

श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, सॅम बिलिंग्ज, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, टीम साऊथी, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी, उमेश यादव

अशी असू शकते ड्रीम ११ टीम :

सॅम बिलिंग्ज, नितीश राणा, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, ड्वेन ब्राव्हो, ॲडम मिल्ने, वरुण चक्रवर्ती

कर्णधार : श्रेयस अय्यर

उपकर्णधार : रवींद्र जडेजा

टॅग्स:

IPL

संबंधित लेख