आज म्हणजे २० जुलै रोजी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. नील आर्मस्ट्राँग हा तो पहिला माणूस हे तर सगळयांनाच माहित आहे. चंद्रावर पहिले पाऊल टाकल्यावर नील आर्मस्ट्राँगने म्हटले होते, "मानवाचे जरी हे छोटे पाऊल असले तरी मानवतेसाठी हा खूप मोठा पल्ला आहे." हे किती खरे होते हे गेल्या वर्षांत सर्वांनी बघितलेच आहे. आज आपण तत्कालीन घडामोडींवर प्रकाश टाकणार आहोत.
२० जुलै १९६९ साली जेव्हा मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले तेव्हा जगभरातल्या ६० कोटी लोकांनी ही घटना पाह्यली होती. २० जुलै रोजी दुपारच्या ४.१७ मिनिटांनी अपोलो ११ हे यान माणसाला घेऊन चंद्रावर उतरणारे पहिले यान ठरले होते.












