अमेरिका आणि रशिया या दोन देशांनी शीतयुद्धाच्या काळात अवकाश संशोधनात प्रचंड वेगाने प्रगती केली. अर्थात याला या दोन देशांतील स्पर्धाही कारणीभूत होतीच. याच काळात वीस एक वर्षांचा एक तरुण देश सुद्धा अवकाश मोहिमेत उतरत होता. हा देश म्हणजे भारत. होमी भाभांच्या नेतृत्वात इस्रोची स्थापना झाली आणि इस्रोने नवनवीन मोहिमेतून आपणही अवकाश विज्ञानात प्रगती करू शकतो हे दाखवून दिले. पण आजवर इस्रोने मानवाला अवकाशात पाठवलं नव्हतं. लवकरच इतिहासात पहिल्यांदाच हे शक्य होणार आहे.
यापूर्वी भारताच्या राकेश शर्मा हा अंतराळवीर अंतराळात जाऊन आला होता. पण, ते रशियाच्या मानवी मिशनचे भाग होते. रशियाने आयोजित केलेल्या चांद्र योजनेतील राकेश शर्मा हे एक सहभागी अंतराळवीर होते. मात्र आता भारताने स्वतः गगनयान मिशनद्वारे आपले अंतराळवीर अंतराळ संशोधनासाठी पाठवण्याचे ठरवले आहे. यासाठी केंद्र सरकारने १० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. २०२२ पर्यंत हे मिशन यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे.










