बाळ आपल्याकडे टक लावून पाहतं तेव्हा आपल्याला त्यात विचित्र असं काही दिसत नाहीं, पण तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं तर एक गोष्ट दिसून येते. बाळ पापण्यांची उघडझाप न करता आपल्याकडे बघत आहे !! हेच जर कोण्या मोठ्या माणसाने केलं तर आपल्याला ते विचित्र वाटू शकतं, पण लहान बळाने आपल्याकडे टक लावून पाहिल्यास आपल्याला ते छान वाटतं.
तुम्ही कधी विचार केलाय का लहान मुलं पापण्यांची उघडझाप का करत नाहीत ? नाही ? मग चला उत्तर समजून घेऊया.











