२३ एप्रिल ही तारीख आरसीबी फॅन्स कधीच विसरू शकत नाही, वाचा काय घडलं होतं या दिवशी

२३ एप्रिल ही तारीख आरसीबी फॅन्स कधीच विसरू शकत नाही, वाचा काय घडलं होतं या दिवशी

आयपीएल (Indian Premiere League) स्पर्धेच्या इतिहासात २३ एप्रिल हा दिवस रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ( Royal challengers Bangalore) संघासाठी अतिशय खास आहे. याच दिवशी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि सर्वात कमी धावसंख्या उभारली होती. ख्रिस गेलच्या तुफानी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २६३ धावांचा डोंगर उभारला होता. तर फ्लॉप फलंदाजीमुळे याच संघाचा डाव अवघ्या ४९ धावांवर संपुष्टात आला होता. याच दिवशी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे.

पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्ध उभारली होती सर्वात मोठी धावसंख्या

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आजच्याच दिवशी (२३ एप्रिल,२०१३) पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्ध उभारली होती. या सामन्यात युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने अवघ्या ६६ चेंडूंमध्ये नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने १३ चौकार आणि १७ गगनचुंबी षटकार मारले होते. आयपीएल स्पर्धेतील ही सर्वात मोठी वैयक्तिक खेळी आहे. मुख्य बाब म्हणजे ख्रिस गेलला वगळता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील इतर फलंदाजांना ३५ धावांचा आकडा देखील पूर्ण करता आला नव्हता. या धावांचा पाठलाग करताना पुणे वॉरियर्स इंडिया संघाला अवघ्या १३३ धावा करता आल्या होत्या. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १३० धावांनी आपल्या नावावर केला होता. 

२०१७ मध्ये अवघ्या ४९ धावांवर संपुष्टात आला होता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा डाव

आयपीएल स्पर्धेत २३ एप्रिल २०१७ रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये एकतर्फी सामना पार पडला होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १३१ धावा केल्या होत्या. १३२ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा डाव अवघ्या ४९ धावांवर संपुष्टात आला होता. या संघातील एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा देखील पूर्ण करता आला नव्हता.

विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आयपीएल २०२२ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद फाफ डू प्लेसिच्या हाती आहे. या संघाने आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले आहेत. ज्यात त्यांना ५ विजय मिळवण्यात यश आले आहे. १० गुणांसह हा संघ तिसऱ्या स्थानी आहे.

टॅग्स:

IPL

संबंधित लेख