आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेतील ३५ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडणार आहे. हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत. कारण गुजरात टायटन्स संघाचे हे पदार्पणाचे पहिलेच वर्ष आहे.
तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेतील कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत एकूण ६ सामने खेळले आहेत. ज्यात या संघाला ५ विजय मिळवण्यात यश आले आहे. हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. या संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. ज्यात या संघाला ३ सामने जिंकण्यात यश आले आहे.
या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११
कोलकाता नाईट रायडर्स
श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, आरोन फिंच, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी, उमेश यादव, पॅट कमिन्स
गुजरात टायटन्स
हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धीमान साहा, शुबमन गिल, अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, अल्झारी जोसेफ
अशी आहे बोभाटाची प्लेइंग ११
वृद्धिमान साहा, शुबमन गिल, डेविड मिलर, श्रेयस अय्यर, आरोन फिंच, आंद्रे रसेल, सुनील नरेन, हार्दिक पांड्या, राशीद खान, मोहम्मद शमी, उमेश यादव
कर्णधार - हार्दिक पंड्या
उपकर्णधार - आंद्रे रसेल




