रावळपिंडी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तर आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर अनेक दिग्गज फलंदाजांना अडचणीत टाकले होते. त्याने २००३ विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. या चेंडूचा वेग ताशी १६१.३ किलोमीटर इतका होता. १९ वर्ष होऊन गेली तरीदेखील हा विक्रम कुठल्याही गोलंदाजाला मोडता आला नाहीये. ऑस्ट्रेलियाचे भन्नाट वेगाने गोलंदाजी करणारे शॉन टेट आणि ब्रेट ली या विक्रमाच्या जवळपास पोहोचले. परंतु त्यांनाही हा विक्रम मोडता आला नाही. चला तर पाहूया आयपीएल २०२२ स्पर्धेतील असे ३ गोलंदाज जे शोएब अख्तरचा हा विक्रम मोडून काढू शकतात.
आयपीएल २०२२ स्पर्धेतील हे ३ गोलंदाज मोडू शकतात शोएब अख्तरचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम!! पाहा यादी


१) लॉकी फर्ग्युसन
न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) हा मोजक्याच गोलंदाजांपैकी एक आहे, जो सतत १५० पेक्षा अधिक गतीने गोलंदाजी करू शकतो. आयपीएल २०२२ स्पर्धेत तो गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने अनेकदा ताशी १५० किलोमीटर इतक्या वेगाने गोलंदाजी केली आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील त्याने ताशी १५० किलोमीटर इतक्या वेगाने गोलंदाजी केली होती.

२) एनरीक नॉर्खिया
दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्पीडगन म्हणून ओळखला जाणारा एनरीक नॉर्खिया देखील गतीच्या बाबतीत अनेक दिग्गजांना टक्कर देतोय. २०२० मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने आपल्या गतीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. त्याने २०२० मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. त्या चेंडूची गती ताशी १५६.२२ किलोमीटर इतकी होती. या हंगामात देखील त्याने १५० पेक्षा अधिक गतीने गोलंदाजी केली आहे.

३) उमरान मलिक
उमरान मलिक या २२ वर्षीय गोलंदाजाचे नाव केवळ भारतातच नव्हे तर परदेशात देखील प्रत्येकाच्या तोंडावर असेल. ज्या वयात नवखे गोलंदाज दिग्गज फलंदाजांसमोर गोलंदाजी करताना थर थर कापतात. त्याच वयात या गोलंदाज सतत ताशी १५२, १५३ किलोमीटरच्या गतीने गोलंदाजी करतोय. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने आपलाच विक्रम मोडून काढत, आयपीएल स्पर्धेतील आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने दिल्ली विरुध्द झालेल्या सामन्यात चक्क ताशी १५७ किलोमीटरच्या गतीने चेंडू टाकला. येणाऱ्या काळात नक्कीच हा गोलंदाज शोएब अख्तरचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम मोडून काढू शकतो.
यातलं कोण रावळपिंडी एक्सप्रेसचा विक्रम मोडेल असं तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये तुमचे अंदाज तर सांगा..
टॅग्स:
संबंधित लेख

आयपीएल स्पर्धेतून अचानक गायब झालेले खेळाडू! एकाने तर केकेआरला बनवले होते चॅम्पियन...
२८ डिसेंबर, २०२२

आयपीएल लिलावात या ५ खेळाडूंवर असेल सर्वांची नजर; मोडू शकतात कमाईचे आजवरचे विक्रम...
२२ डिसेंबर, २०२२

आयपीएल स्पर्धेत या फलंदाजांनी पाडला आहे षटकारांचा पाऊस; यादीत केवळ २ भारतीय...
२० डिसेंबर, २०२२

आयपीएल २०२३ स्पर्धेच्या लिलावात हे ५ खेळाडू होऊ शकतात मालामाल! लागू शकते कोट्यावधींची बोली...
८ डिसेंबर, २०२२