आयपीएल २०२२ स्पर्धा या '५' खेळाडूंसाठी ठरू शकते शेवटची स्पर्धा, येणाऱ्या हंगामात होऊ शकतात बाहेर...

आयपीएल २०२२ स्पर्धा या '५' खेळाडूंसाठी ठरू शकते शेवटची स्पर्धा, येणाऱ्या हंगामात होऊ शकतात बाहेर...

आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना येत्या रविवारी पार पडणार आहे. या स्पर्धेत तिलक वर्मा, उमरान मलिक आणि डेवाल्ड ब्रेविस सारखे युवा खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसून आले. तर काही दिग्गज खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र त्यांना या हंगामात साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, हा हंगाम काही दिग्गज खेळाडूंसाठी शेवटचा हंगाम ठरू शकतो. कोण आहेत ते खेळाडू? चला जाणून घेऊया.

) मोहम्मद नबी (Mohammad Nabi) :

अफगानिस्तान संघातील दिग्गज खेळाडू मोहम्मद नबी हा जगभरातील लीग स्पर्धा खेळताना दिसून येत असतो. गेल्या काही वर्षांपासून त्याने सनरायझर्स हैदराबाद संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या मेगा लिलावातील पहिल्या फेरीत तो अन्सोल्ड राहिला होता. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली नव्हती. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, आयपीएल २०२२ स्पर्धेतील हंगाम हे मोहम्मद नबी साठी शेवटचे हंगाम ठरू शकते.

२) आरोन फिंच (Aaron Finch) :

आयपीएल २०२२ स्पर्धेतील मेगा लिलावात आरोन फिंच अन्सोल्ड राहिला होता. परंतु हंगाम सुरू झाल्यानंतर ॲलेक्स हेल्सने माघार घेतल्यानंतर बदली खेळाडू म्हणून, आरोन फिंचला कोलकाता नाईट रायडर्स संघात स्थान देण्यात आले होते. परंतु त्याला या हंगामात देखील साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ॲलेक्स हेल्सचे पुनरागमन झाल्यानंतर आरोन फिंच संघाबाहेर जाणार हे नक्की आहे. 

) कायरन पोलार्ड (Kieron Pollard)

वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्डला या हंगामात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. आयपीएल २०२२ स्पर्धा सुरू असताना त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. तसेच शेवटच्या काही सामन्यांमध्ये त्याने निराशाजनक कामगिरी केली होती. याच कारणामुळे त्याला संघाबाहेर राहावे लागले होते. २०१० पासून मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या कायरन पोलार्डचे हे शेवटचे हंगाम असू शकते.

) अजिंक्य रहाणे (Ajinkya rahane) :

अजिंक्य रहाणेने गतवर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला मूळ किंमतीत आपल्या संघात स्थान दिले होते. अजिंक्य रहाणेला या सामन्यातील काही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. परंतु तो स्वतःला सिद्ध करण्यास अपयशी ठरला. त्यामुळे हे हंगाम अजिंक्य रहाणेसाठी शेवटचे हंगाम ठरू शकते.

) मॅथ्यू वेड (Matthew wade : 

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज मॅथ्यू वेड देखील आयपीएल २०२२ स्पर्धेच्या मेगा लिलावातील पहिल्या फेरीत अन्सोल्ड राहिला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात गुजरात टायटन्स संघाने २.४ कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिले होते. त्याला या हंगामातील काही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे हे हंगाम मॅथ्यू वेड साठी शेवटचे हंगाम ठरू शकते.

टॅग्स:

IPL

संबंधित लेख