ख्रिस्तीयानो रोनाल्डो हा जगभरातील तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेला खेळाडू. गरिबीतून वर येऊन त्याने जगातला सर्वोकृष्ठ फुटबॉल खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलं आहे. रोनाल्डोला इन्स्टाग्रामवर जगात सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत. एवढ्या उंचीवर गेलेला हा माणूस आपल्या जगण्यातून मात्र नेहमीच शिकवण देत असतो. रक्तदान करण्यासाठी अंगावर टॅटू न काढणे असो की आपल्या फॅन्सना न टाळता त्यांना भेटने असो यामुळे तो उठून दिसतो. त्याचा फिटनेस देखील तसा कौतुकाचा विषय!
रोनाल्डो कुठल्याच अंगाने ३६ वर्षांचा वाटत नाही. २५ वर्षांचा खमका तरुण असल्या सारखी त्याची फिटनेस आहे. या फिटनेससाठी त्याने तशी मेहनत देखील घेतली आहे. बाहेरचे खाणे, कोल्ड्रिंक्स, फास्टफूड तो टाळत असतो. सध्या त्याचा या गोष्टींचा आग्रह किती मोठा आहे हे सिद्ध करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.





