आयपीएल २०२२( IPL 2022) स्पर्धेच्या १२ व्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनऊ सुपरजायंट्स (SRH vs LSG) या संघासोबत रंगणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील ( D Y patil stadium) स्टेडियममध्ये पार पडणार आहे. लखनऊ सुपरजायंट्स संघाची आयपीएल स्पर्धा खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत.
या हंगामातील पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर लखनऊ सुपरजायंट्स संघाला देखील चांगली सुरुवात करता आली नव्हती. त्यांना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करत पहिल्याच विजयाची नोंद केली होती.
या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११
सनरायझर्स हैदराबाद:
केन विल्यमसन (कर्णधार), निकोलस पूरन, राहुल त्रिपाठी, अब्दुल समद, एडन मार्कराम, वॉशिंग्टन सुंदर, रोमॅरियो शेफर्ड, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक
लखनऊ सुपर जायंट्स :
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, आवेश खान, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमिरा, अँड्र्यू टाय
अशी असू शकते ड्रीम ११ टीम :
केएल राहुल, क्विंटन डी कॉक, एविन लुईस, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन, एडन मार्कराम, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, आवेश खान, रवी बिश्नोई, अँड्र्यू टाय
कर्णधार - क्विंटन डी कॉक
उपकर्णधार - एडन मार्कराम




