इंडियन प्रीमियर लीग ( indian premier league )२०२२ स्पर्धेतील पाचवा सामना सनरायझर्स हैदराबाद (sunrisers Hyderabad आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan royals) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना पुणे येथे खेळवला जाणार आहे. या हंगामात पहिल्यांदाच हे दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत, त्यामुळे विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगू शकते.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात हे दोन्ही संघ आतापर्यंत १५ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने ८ वेळेस विजय मिळवला आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाला ७ वेळेस विजय मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे हा विजय मिळवून राजस्थान रॉयल्स संघ ८-८ च्या बरोबरीत येण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११
सनरायझर्स हैदराबाद :
केन विलियमसन (कर्णधार), निकोलस पूरन, राहुल त्रिपाठी, अब्दुल समद, एडन मार्कराम, वॉशिंग्टन सुंदर, रोमॅरियो शेफर्ड, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, श्रेयस गोपाल
राजस्थान रॉयल्स :
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, जेम्स नीशम, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, प्रसिध्द कृष्णा, नवदीप सैनी
अशी असू शकते ड्रीम ११ टीम :
संजू सॅमसन, जोस बटलर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, वॉशिंग्टन सुंदर, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, टी नटराजन
कर्णधार : जोस बटलर
उपकर्णधार : निकोलस पूरन




