आज होणाऱ्या सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची ड्रीम ११

आज होणाऱ्या सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची  ड्रीम ११

आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेतील ४० वा सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या हंगामात हे दोन्ही संघ ११ एप्रिल रोजी आमने सामने आले होते. या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाने गुजरात टायटन्स संघाला ८ गडी राखून पराभूत केले होते. 

आयपीएलच्या १५ व्या हंगामात गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले आहेत. ज्यात या संघाला ६ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तसेच सनरायजर्स हैदराबाद संघाने सुरवातीचे दोन सामने गमावल्यानंतर सलग पाच सामन्यात विजय मिळवला आहे. हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११ 

गुजरात टायटन्स

 हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा, शुबमन गिल, अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, अल्झारी जोसेफ

 सनरायझर्स हैदराबाद

 केन विलियमसन (कर्णधार), निकोलस पूरन, राहुल त्रिपाठी, शशांक सिंग, एडन मार्कराम, जगदीश सुचित, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक

अशी आहे बोभाटाची ड्रीम ११ टीम 

निकोलस पूरन, शुबमन गिल, डेविड मिलर, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हार्दिक पंड्या, राशीद खान, मोहम्मद शमी, यश दयाल, टी नटराजन

 कर्णधार - हार्दिक पंड्या

 उपकर्णधार - राहुल त्रिपाठी

टॅग्स:

IPL

संबंधित लेख