आयपीएल २०२२(Ipl 2022) स्पर्धेतील ३८ वा सामना पंजाब किंग्ज (Punjab kings) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super kings) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेत ३ एप्रिल रोजी हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने अप्रतिम कामगिरी करत ५४ धावांनी विजय मिळवला होता.
तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, पंजाब किंग्ज संघाने आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले आहेत, ज्यात या संघाला ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. हा संघ गुणतालिकेत ८ व्या स्थानी आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला ८ पैकी केवळ २ सामन्यात विजय मिळवता आला आहे. हा संघ गुणतालिकेत ९ व्या स्थानी आहे.
या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११
पंजाब किंग्ज :
मयांक अगरवाल (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा, शाहरुख खान, नॅथन एलिस, कगिसो रबाडा, वैभव अरोरा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग
चेन्नई सुपर किंग्ज
रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी, मिचेल सँटनर, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, महिश थिक्षना, ड्वेन ब्रावो, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी
अशी आहे बोभाटाची ड्रीम ११
जितेश शर्मा, रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, मयंक अग्रवाल, शिखर धवन, रवींद्र जडेजा, लियाम लिव्हिंगस्टन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, ड्वेन ब्रावो, मुकेश चौधरी
कर्णधार - लियाम लिव्हिंगस्टन
उपकर्णधार - रॉबिन उथप्पा




