आयपीएल २०२२ (IPl 2022) स्पर्धेतील १४ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पुणे येथे रंगणार आहे. या दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, हे दोन्ही संघ आतापर्यंत २९ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यामध्ये २२ वेळेस मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर केवळ ७ वेळेस कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवता आला आहे.
तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाला आतापर्यंत साजेशी कामगिरी करता आली नाहीये. मुंबई इंडियन्स संघाने खेळलेल्या २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना २ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११
मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स
कोलकाता नाईट रायडर्स :
श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी, उमेश यादव, टीम साऊदी
अशी असू शकते ड्रीम ११ टीम :
इशान किशन, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, टीम साऊदी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्स
कर्णधार - इशान किशन
उपकर्णधार - आंद्रे रसेल




