राजस्थान वि. गुजरात सामना फिक्स होता? राजस्थानवर होताय गंभीर आरोप...

राजस्थान वि. गुजरात सामना फिक्स होता? राजस्थानवर होताय गंभीर आरोप...

आयपीएल २०२२ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (२९ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. हा सामना गुजरात टायटन्स संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह पहिल्याच हंगामात जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला. हा सामना गुजरात टायटन्स संघातील खेळाडूंसाठी अतिशय खास ठरला.

गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत करत तर राजस्थान रॉयल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. १ लाख २५ हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांसमोर हा रोमांचक सामना पार पडला. २ वर्षानंतर पहिल्यांदाच अंतिम सामन्याचे आयोजन जोरदार करण्यात आले होते. मात्र सामना झाल्यानंतर नेटकरी निराश असल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की, हा सामना फिक्स होता.

राजस्थान रॉयल्सवर केले जात आहेत फिक्सिंगचे आरोप

तर झाले असे की, राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने सुरुवातीपासूनच आपला दबदबा निर्माण केला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याच्या निर्णयावरून अनेकांना आश्चर्य झाले होते. आता सामना गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्सवर फिक्सिंगचे आरोप केले जात आहेत.

गुजरात टायटन्स विरुध्द राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रीया..

टॅग्स:

IPL

संबंधित लेख