गुजरात ठरले चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स!! राजस्थान वर मिळवला ७ गडी राखून विजय

गुजरात ठरले चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स!! राजस्थान वर मिळवला ७ गडी राखून विजय

आयपीएल २०२२ स्पर्धेतील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ७ गडी राखून जोरदार विजय मिळवला. यासह पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. या सामन्यात देखील शुबमन गिल आणि डेविड मिलर यांनी मोलाची भूमिका बजावली.

गुजरात टायटन्स संघाने क्वालिफायर १ च्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. तर राजस्थान रॉयल्स संघाने क्वालिफायर २ च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने सुरुवातीपासूनच राजस्थान रॉयल्स संघावर दबाव बनवून ठेवला होता.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरने ३९ धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने २२ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाला २० षटक अखेर ९ बाद १३० धावा करण्यात यश आले होते. 

या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाकडून शुबमन गिलने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्याने ३४ धावांचे योगदान दिले. तसेच शेवटी डेविड मिलरने शुबमन गिलला चांगली साथ देत नाबाद ३२ धावांचे योगदान दिले. हा सामना गुजरात टायटन्स संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला.

टॅग्स:

IPL

संबंधित लेख