कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात काल खेळण्यात आलेल्या सामन्यात कॅप्टन इयान मॉर्गनच्या संयमी खेळीच्या जीवावर कोलकाताने विजय मिळवला आहे. पण या सामन्यात मात्र एक अनोखी घटना घडली. सामन्यापेक्षा जास्त चर्चा या घटनेची होत आहे.
मैदानावर सामना सुरू असताना कोलकाता संघाचे मार्गदर्शक नाथन लिमन यांनी एक कार्ड मैदानावरील कॅप्टन इयान मॉर्गन यांना दाखवला, ज्यावर ५४ हा आकडा लिहिलेला होता. आता या ५४ चा अर्थ काय याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न कमेन्टेटर्स आणि प्रेक्षकांनी लावून पाहिला. सर्व अंदाज मात्र अंदाजच राहिले. या ५४ अंकामागील कोडे मात्र सुटलेले नाही.






