आज २६ एप्रिल ! आज आरती प्रभू या नावाने परिचित असलेल्या चिं. त्र्यं. खानोलकर यांची पुण्यतिथी आहे. आरती प्रभू यांचे नाव मनात आल्यावर अनेक गाणी मनात वाजायला सुरुवात होते. कसे कसे हसायचे, कोणाच्या खांद्यावर, समईच्या शुभ्र कळ्या, गेले द्यायचे रहून, ती येते आणिक जाते, नाही कशी म्हणू तुला, लवलव करी पातं अशी अनेक गाणी आठवतात पण या सगळ्या गीतात सगळ्यांनाच आवडणारे गाणे आणि आजच्या भाषेत सांगायचं तर सगळ्यात 'व्हायरल' झालेलं गाणं म्हणजे
ये रे घना, ये रे घना,
न्हाऊ घाल माझ्या मना
या गाण्याच्या निर्मितीमागे एक कहाणी आहे जी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.








