धोनीची अर्धशतकी खेळी व्यर्थ!! पहिल्याच लढतीत केकेआरने मारली बाजी; पाहा सामन्याचे हायलाईट्स

धोनीची अर्धशतकी खेळी व्यर्थ!! पहिल्याच लढतीत केकेआरने मारली बाजी; पाहा सामन्याचे हायलाईट्स

आयपीएल २०२२ स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने अप्रतिम कामगिरी करत ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ५ गडी बाद १३१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ४ गडी गमावत १९ व्या षटकात हे आव्हान पूर्ण केले.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय अगदी योग्य ठरला कारण, कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या गोलंदाजांनी पावरप्लेच्या षटकात मोठी धावसंख्या करू दिली नाही. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड स्वस्तात माघारी परतले होते. 

त्यानंतर रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडू यांनी डाव सावरत भागीदारी करायला सुरुवात केली. रॉबिन उथप्पाने या डावात २८ तर अंबाती रायुडूने १५ धावांचे योगदान दिले. शेवटी रवींद्र जडेजाने नाबाद २६ आणि एमएस धोनीने ५० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाला २० षटक अखेर ५ बाद १३१ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर वेंकटेश अय्यरने १६,नितीश राणाने २१ आणि कर्णधार श्रेयस अय्यरने २० धावांचे योगदान दिले. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला.

टॅग्स:

IPL

संबंधित लेख