आयपीएल २०२२ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झालं आहे. या स्पर्धेतील पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघाचा नवनिर्वाचित कर्णधार रवींद्र जडेजा पहिल्यांदाच नाणेफेक करण्यासाठी मैदानावर आला होता. परंतु त्याला नाणेफेक जिंकता आले नाही. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आतापर्यंत २६ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने १७ वेळेस तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने ८ वेळेस विजय मिळवला आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११
कोलकाता नाईट रायडर्स :
श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, सॅम बिलिंग्ज, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी, उमेश यादव
चेन्नई सुपर किंग्ज :
रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, मिचेल सँटनर, ड्वेन ब्रावो, ॲडम मिल्ने, तुषार देशपांडे




