व्हिडीओ ऑफ दि डे : धोनी आणि फॅनची पकडापकडी....पाहा हा व्हिडीओ !!

व्हिडीओ ऑफ दि डे : धोनी आणि फॅनची पकडापकडी....पाहा हा व्हिडीओ !!

महेंद्रसिंग धोनी फिल्डवरच्या कामगिरी सोबतच त्याच्या ‘ऑफ दि फिल्ड’ कामगिरीसाठी नेहमीच चर्चेत असतो. आठवतंय का त्याने भारताचा झेंडा जमिनीवर पडता पडता सावरला होता? धोनीला अधूनमधून फॅन्स भेटत असतात आणि असे प्रसंग घडत असतात. कालच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यातही असाच एक प्रसंग घडला. हा पाहा व्हिडीओ.
 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या ODI सामन्याच्या सुरुवातीलाच हा प्रसंग घडला. धोनीच्या एका फॅनने सुरक्षा भेदून मैदानात उडी घेतली. त्याच्या टी-शर्टवरूनच तो धोनीचा फॅन आहे हे ओळखता येत होतं. त्याच्या टी-शर्ट लिहिलं होतं “थाला”. बस नामही काफी है !!!

तर, यावेळी धोनीने फॅनला पळवायचं ठरवलं होतं. तो जवळ आल्यावर माहीने पाळायला सुरुवात केली, मग त्याच्या मागे तो फॅन पण पळू लागला. ही पकडापकडी बघून टीम इंडियालाही हसू आवरलं नाही. हा प्रसंग सामन्याचा हायलाईट ठरला राव !!

आणखी वाचा :

धोनीने राखली तिरंग्याची शान....धोनीच्या या कामगिरीने त्याचे विरोधक पण त्याला सलाम ठोकतील !!

टॅग्स:

dhonimarathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख