जगातील सर्वात जुनी स्पर्धा ऑलिम्पिक जपानमधल्या टोक्योमध्ये होऊ घातली आहे. आतापर्यंत अनेक बदल ऑलिम्पिकमध्ये करण्यात आलेले आहेत. जपानसारख्या तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या देशात ऑलिम्पिक होत आहेत म्हटल्यावर काहीतरी भन्नाट बदल पाहायला मिळणे तसे साहजिक आहे.
यावेळी पहिल्यांदा विजेत्या खेळाडूंना दिली जाणारी पदके ही रिसायकल्ड इलेक्ट्रॉनिक्सपासून तयार करण्यात आलेली आहेत. आजवर स्पर्धांमध्ये दिल्या जाणाऱ्या पदकांत सोने चांदी, तांबे अशा धातूंचा उपयोग करण्यात येत असे. ऑलिम्पिकमध्येही याच धातूंची पदके आजवर असायची.





