नाणेफेक जिंकून गुजरातचा गोलंदाजीचा निर्णय, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

नाणेफेक जिंकून गुजरातचा गोलंदाजीचा निर्णय, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

आयपीएल २०२२ ( ipl 2022) स्पर्धेतील १६ वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू आहे. या रोमांचक सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरात टायटन्स संघाचे आयपीएल स्पर्धेतील पदार्पणाचे हंगाम आहे. त्यामुळे पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत. तसेच या दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये दोन्ही सामन्यात गुजरात टायटन्स संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर पंजाब किंग्ज आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना २ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

पंजाब किंग्ज 

मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन,जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, वैभव अरोरा, राहुल चाहर आणि अर्शदीप सिंग

गुजरात टायटन्स :

हार्दिक पंड्या ( कर्णधार) मॅथ्यू वेड, शुबमन गिल, साई सुदर्शन, डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, दर्शन नळकांडे

टॅग्स:

IPL

संबंधित लेख