आयपीएल २०२२ स्पर्धेतील १३ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्स संघ धावांचा डोंगर उभारण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. या संघाने सलग दोन सामन्यात दोन विजय मिळवले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून राजस्थान रॉयल्स संघाला विजयाची हॅटट्रिक करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना एक सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११
राजस्थान रॉयल्स :
जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडीक्कल, संजू सॅमसन ( कर्णधार), शिमरोन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर :
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक, शेफरन रुदरफोर्ड , शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, डेविड विली, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, अक्ष दीप




