भारतात क्रिकेटवर प्रेम करणारे कोट्यवधी आहेत. त्यापैकी काही क्रिकेट चाहते असे आहेत ज्यांना क्रिकेटची खूप चांगली पारख आहे. या क्रिकेट चाहत्यांना जाऊन एक साधा सोपा प्रश्न विचारला की, "तुम्हाला राहुल द्रविड क्रिकेटपटू म्हणून कसा वाटतो?" तर त्यांचं उत्तर सरळ शब्दात असच असेल की, "शांत आणि संयमी क्रिकेटपटू आहे." राहुल द्रविड शांत आहे, संयमी आहे याला अपवाद नाहीये. मात्र क्रिकेट कारकीर्द सुरू असताना राहुल द्रविड अनेकदा वादात अडकला होता, हे खूप कमी लोकांना माहीत आहे. चला तर पाहूया राहुल द्रविडच्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान घडलेले टॉप - ३ वाद. (Rahul dravid)
१) सौरव गांगुली (Sourav ganguly) सोबत झाला होता वाद:
ग्रेग चॅपेल जेव्हा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते त्यावेळी सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांचे मदभेत असल्याचा बातम्या समोर आल्या होत्या. त्यावेळी ग्रेग चॅपेलने आपल्या कोचिंग पॉवरच्या जोरावर सौरव गांगुलीला संघाबाहेर केलं होतं. या प्रकरणात राहुल द्रविड फक्त हा मध्ये हा मिळवत होता. तो कुठलीही प्रतिक्रीया देत नव्हता. त्यावेळी सौरव गांगुलीने वक्तव्य करत म्हटले होते की, चूक राहुल द्रविडची होती. कारण राहुल द्रविड, ग्रेग चॅपेलने घेतलेल्या निर्णयांना विरोध करत नव्हता. २००७ विश्वचषक स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर बीसीसीआयने ग्रेग चॅपेलला मुख्य प्रशिक्षक पदावरून काढून टाकले होते.
२) चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान शोएब अख्तर सोबत झाला होता वाद:
राहुल द्रविड १६ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत कधीच संताप व्यक्त करताना दिसून आला नव्हता. मात्र २००४ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत राहुल द्रविडचे रौद्ररूप पाहायला मिळाले होते. तर झाले असे की, राहुल द्रविड शॉट खेळल्यानंतर जेव्हा रन घेण्यासाठी धावला. त्यावेळी शोएब अख्तर आणि त्याची जोरदार धडक झाली. ही धडक झाल्यानंतर शोएब अख्तर रागात राहुल द्रविडला काहीतरी म्हणाला. शोएब अख्तरला प्रत्युत्तर देत राहुल द्रविड देखील आक्रमक झाला. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू होती. त्यावेळी पंच आणि खेळाडूंनी मध्यस्ती करत प्रकरण वेळीच सावरलं. या सामन्यात भारतीय संघाला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.
३) स्पॉट फिक्सिंग प्रकरणावेळी होता राजस्थान रॉयल्सचा कर्णधार :
२०१३ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग प्रकरण उघडकीस आले होते. त्यावेळी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण हे गोलंदाज दोषी आढळून आले होते. या प्रकरणात अडकल्यानंतर या खेळाडूंना काही महिने तुरुंगवास देखील झाला होता. एस श्रीसंत सह अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या गोलंदाजांचा या प्रकरणात समावेश होता. २०१३ आयपीएल स्पर्धा सुरू असताना एस श्रीसंतसह अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना दिल्ली पोलिसांनी हॉटेलमधून अटक केली होती. त्यांनतर तिन्ही खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते. बीसीसीआयने कारवाई करत या खेळाडूंवर आजीवन बंदी घातली होती. त्यावेळी राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता. त्यामुळे राहुल द्रविडची देखील जोरदार चर्चा सुरू होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड सारखा शांत आणि संयमी खेळाडू कोण आहे? कमेंट करून नक्की कळवा.




