सर रविंद्र जडेजा आजच्या तारखेला भारतीय संघाची एक मोठी भिस्त असलेला खेळाडू म्हणून ओळखला जातो. खेळाडू ऑल राऊंडर असला म्हणजे तो चांगली बॅटिंग आणि बॉलिंग करू शकतो अशी सहसा समजूत असते, पण सर जडेजांचा स्वॅग वेगळा आहे. ते फिल्डिंग देखील भन्नाट करतात. १६ तारखेला झालेल्या सामन्यात त्यांनी केलेल्या जबरदस्त फिल्डिंगचा व्हिडीओ वायरल होत आहे. असे कित्येक व्हिडीओ सापडतील ज्यात सर जडेजा आपल्या फिल्डिंगने समोरच्या फिल्डरला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवत आहेत.
पण सर जडेजांच्या करियरमध्ये एकदा असेही घडले होते की खुद्द त्यांनाच पॅव्हेलियनमध्ये बसावे लागले. काय घडलं होतं ? जाणून घेऊया !!






