‘इडियट’ लिहिल्यावर ट्रम्प तात्यांचा फोटो का येतो ?' - सुंदर पिचाई यांनी दिलंय उत्तर !!

लिस्टिकल
‘इडियट’ लिहिल्यावर ट्रम्प तात्यांचा फोटो का येतो ?' - सुंदर पिचाई यांनी दिलंय उत्तर !!

“गुगलवर Idiot सर्च केल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो का दिसतो ?” हा गुगली प्रश्न गुगलचे CEO सुंदर पिचाई यांना थेट अमेरिकेच्या सिनेटने (अमेरिकन काँग्रेसच्या दोन सभागृहांपैकी एक) विचारला होता. यावर सुंदर पिचाई यांनी काय म्हटलं पाहा !!

मंडळी, काही महिन्यापूर्वी हा प्रकार घडला होता. Idiot लिहिल्यावर ट्रम्प यांचा चेहरा यायचा. आताही तुम्ही सर्च केलंत, तर इमेज सेक्शन मध्ये ट्रम्प तात्याच दिसतील. याबद्दल स्पष्टीकरण मागितल्यावर सुंदर पिचाई यांनी असं म्हटलं, जेव्हा एखादा शब्द सर्च केला जातो तेव्हा त्या शब्दाला त्याच्याशी संबंधित वेब पेजेस सोबत आणि २०० सिग्नल्स सोबत तपासून पाहिलं जातं. लोकप्रियता, संबंधित असलेले वेब पेजेस, इतर व्यक्तींनी केलेला त्या शब्दाचा वापर, शिवाय सध्याच्या घडीला तो शब्द वापरला जातोय का इत्यादी गोष्टी पाहिल्या जातात. पुढे सुंदर पिचाई म्हणाले की ‘अधिकाधिक चांगल्या पद्धतीने माहिती सादर करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.’

तर एकूण काय तर इंटरनेटवर Idiot या शब्दाशी डोनाल्ड ट्रम्प जोडलेले असल्याने Idiot लिहिल्यावर त्यांचा फोटो दिसतो असं त्यांचं म्हणनं आहे. हा प्रश्न असाच न सोडता सिनेट मधील झोई लॉफ्ग्रेन यांनी त्यांना एक वाकडा प्रश्न विचारला. त्यांनी म्हटलं की ‘याचा अर्थ गुगलच्या सर्चेस मध्ये कोणी तिसरी व्यक्ती ढवळाढवळ करत नाही तर ?’ यावर सुंदर पिचाई यांनी हसून ‘गुगल या पद्धतीने काम करत नाही’ असं म्हटलं.

मंडळी, साडेतीन तास सुरु असलेल्या सेनेट मधल्या प्रश्नोत्तर सत्रात सुंदर पिचाई यांना असेच गुगली प्रश्न झेलावे लागले. मंत्रिमंडळातील एकाने त्यांना विचारलं की ‘माझ्या ७ वर्षांच्या नातीच्या आयफोनवर माझ्याबद्दल आक्षेपार्ह माहिती कशी आली ?’ त्यावर सुंदर पिचाई म्हणाले ‘आयफोन बनवणारी कंपनी वेगळी आहे...’. यावर तिथे बसलेले मंत्री सुद्धा हसले राव.

मंडळी, या सर्व सत्रात एक गोष्ट दिसली. ती म्हणजे, तिथे उपस्थित मोठ्या पदावरील व्यक्तींना इंटरनेट नेमकं कसं काम करतं याबद्दल काहीच माहित नाहीये.....

 

आणखी वाचा :

हा भारतातला माणूस ट्रम्प तात्यांना देव्हाऱ्यात ठेऊन पूजा का करतोय ?

डोनाल्ड तात्याचा नग्न पुतळा विकला गेला तब्बल एवढ्या मोठ्या किमतीला....

'ट्रम्प' तात्यांचं नाव असलेलं हे भारतातलं गाव माहितीये का ?...वाचा बरं कुठे आहे हे गाव !!!

बघा गोट्यानं घेतलेला ट्रम्प तात्याचा इंटरव्यू...तात्या बघणार भारत पाकिस्तान मॅच !!

'मुरंबा' बघून ट्रम्प तात्या झाले मिथिलावर फिदा...बघा हा व्हीडोओ !!

ट्रम्प तात्यांचा बाहूबली रिव्ह्यू आणि तोही मराठीत !!

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख