एखादा हॉलीवूडचा चित्रपट पाहिलाय का हो? ज्यामध्ये एखादया शहरावर एक अजस्त्र,अमानवी प्राण्याचा शहरवासीयांवर हल्ला होतो. पहिल्या हल्ल्यात तो पूर्ण शहराचे नुकसान करतो, अनेकांचे जीव घेतो. मग पुढचा हल्ला करण्यापूर्वी पूर्ण यंत्रणा त्याच्याशी युद्ध करायला तयार होते. पुढच्या हल्ल्यात संरक्षण यंत्रणा त्याला नेस्तनाबूत करून सुटकेचा निश्वास टाकते पण तोवर त्याच्यापेक्षा अजून मोठा प्राणी तयार होतो आणि पुढचा हल्ला करतो.
अगदी असंच काहीसं झालंय, पण चित्रपटात नाही. नुकतंच संशोधकांनी कोरोनावर लस तयार केली आहे. त्याचे लसीकरण सर्वत्र सुरू होईलच. पण संशोधकांपुढे अजून एक नवे आव्हान उभे राहिले आहे. ब्रिटनमध्ये नुकत्याच आलेला कोरोनाच्या नव्या प्रकाराबद्दल तर आपण वाचलेच असेल. त्यावर संशोधन चालूच आहे. पण अजूनही संकटाची मालिका संपताना दिसत नाहीये. एका मेंदू पोखरणाऱ्या अमिबाने अमेरिकेत हाहाकार माजवलाय..
काय प्रकरण आहे हे? समजून घेऊया...







