माणसाला पंख असते तर? अशी कल्पना आपण केली आणि विमाने आली. नंतर रस्त्यांवर वेगाने धावणाऱ्या कार आल्या. तरीही माणसाचे वेगाचे वेड काही गेले नाही. बुलेट ट्रेन आल्या. वेगवान कार, बाइक्स आल्या. रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम व्हायला लागले. १५ मिनिटाच्या अंतरावर जाण्यासाठी तासभर वेळ लागतोय. मग यावर उपाय म्हणून आपण काय कल्पना शोधून काढली? आपल्या कारलाच उडता यायला हवे. हे काल्पनिक स्वप्न एव्हाना चित्रपटांत अनेकदा दाखवून झाले आहे. पण आता हे स्वप्न पूर्ण व्हायची वेळ आली आहे. होय! तुम्हाला विश्वास बसणार नाही पण उडणारी कार आता प्रत्यक्षात आली आहे. याचा व्हिडिओ एकदा पाहूनच घ्या.
आता उडणाऱ्या कार्स फक्त सिनेमात नाही तर आकाशातही दिसतील...'एअरकार'च्या यशस्वी उड्डाणाची बातमी वाचली का?

या हवाई कारचे नाव आहे 'एअरकार' (AirCar). ही कार चक्क ८२०० फूटांपेक्षा जास्त उंचीवर उडू शकते आणि तिचा वेग ताशी १७० किमी पेक्षा जास्त आहे. एअरकार प्रोटोटाइप १ मध्ये पेट्रोल-पंप इंधनवर चालणारे १६० हॉर्सपावरचे फिक्स-प्रोपेलर इंजिन आहे. हे इंजिन बीएमडब्ल्यूचे आहे. सध्या दोन लोकांना बसता येईल एवढी जागा या कारमध्ये आहे.
नुकतेच या एअरकारने स्लोवाकियातील (Slovakia) नित्रा आणि ब्रातिस्लाव्हा या दोन शहरांमध्ये यशस्वी उड्डाण पूर्ण केले. हे अंतर ७४ किलोमीटर एवढे होते. हे अंतर पूर्ण करण्यासाठी तीन मिनिटांचा अवधी लागला आहे. प्रवासानंतर ही एअर कार कोणत्याही अडचणीशिवाय जमिनीवर उतरली आणि उतरल्याबरोबर अवघ्या तीन मिनिटांत या कारचं रुपांतर स्पोर्ट्स कारमध्ये झाले. मग ती ब्रातिस्लावा (Bratislava) पर्यंत धावली. जवळजवळ ४० मिनिटे ही कार हवेत होती.

एअरकारच्या उड्ताना व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की ती हळूहळू आपले पंख उघडून हवेत उड्डाण करते. अवघ्या २ मिनिटे १५ सेकंदात या कारचे रुपांतर विमानात होते. लँडिंग करताना कारचे पंख मिटले जातात आणि तिचे रुपांतर परत कारमध्ये होते. या कारची कल्पना प्रोफेसर स्टीफन क्लेनची आहे आणि ही कार स्लोवाकियाच्या फर्म क्लेनविजनने बनवली आहे.
क्लेनविजनने सांगितले की हा ऑटो सेक्ट्रसाठी फार महत्त्वाचा बदल होणार आहे. ही कार सुट्टी मध्ये फिरण्यासाठी तसेच कमर्शियल टॅक्सी म्हणून वापरण्यात येऊ शकते. या एअर कारची किंमत काय असेल, ती कोणत्या रूपात सगळ्यांसमोर येईल याची माहिती अजून मिळालेली नाही. परंतु पुढच्या वर्षापर्यंत ही कार आकाशात आणि जमीनीवर दोन्हीकडे उडताना आपल्याला पाहायला मिळेल.

उबरसारख्या राइड-हेलिंग सेवांनी आधीच घोषणा केली आहे की ते भविष्यात अश्या उडणाऱ्या कार आणण्याचा विचार करत आहेत. या कार्समुळे शहरांमध्ये वाहतूक करणे जास्त सोपे होणार आहे. ह्युंदाईसारख्या काही कार निर्माण करणाऱ्या ओईएम देखील उडणाऱ्या हवाई तंत्रज्ञानावर काम करत आहेत.
आता उडणारी कार प्रत्यक्षात पहायला फार वेळ लागणार नाही. नजीकच्या भविष्यात वाहन उद्योगात मोठा बदल येणार आहे अशी अपेक्षा करूयात. वाहन उद्योगात ही नव्या युगाची नांदीच असेल असे वाटते.
लेखिका: शीतल दरंदळे
टॅग्स:
संबंधित लेख
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलपीव्ही सिंधूने या २० कंपन्यांना नोटीस पाठवून तंबी का दिली आहे?
२४ ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलमहिंद्रा बोलेरोत चक्क टॉयलेट? हे टॉयलेट कसे काम करते?
२३ ऑगस्ट, २०२१