ताज हॉटेलच्या रूमचा खर्च फक्त ६ रुपये? हे कसं आहे? हा व्हायरल फोटो पाहिला का?

ताज हॉटेलच्या रूमचा खर्च फक्त ६ रुपये? हे कसं आहे? हा व्हायरल फोटो पाहिला का?

आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या आजीआजोबांना जुन्या काळात किती स्वस्त वस्तू मिळत आणि आता सर्व किती महाग झाले याबद्दल बोलताना ऐकले असेल. तेव्हाच्या किंमती ऐकल्यावर आज त्याच किंमतीत वस्तू मिळाल्या असत्या तर किती भारी झाले असते हा विचार पण तुमच्या मनात आलाच असेल. 

महिंद्रा आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे ट्विटरवर सक्रिय असतात. त्यांचे अनेक ट्विट्स व्हायरल होत असतात. सध्या त्यांनी १९०३ साली ताज हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च किती होता, हे दाखवणारी एक जाहिरात पोस्ट केली आहे. भारतातल्या त्याकाळच्या सर्वाधिक भारी पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्रभर मुक्कामाचा खर्च होता ६ रुपये होता!!!

आनंद महिंद्रा यांनी यावर मिश्किल टिप्पणी करत टाइम मशीनद्वारे या जुन्या काळात जाऊन ६ रुपयांत ताज हॉटेलमध्ये राहता येईल असे म्हटले आहे. १९०३ साली ताज महाल पॅलेस हॉटेलची सुरुवात करण्यात आली तेव्हाचा हा फोटो आहे.

आनंद महिंद्रा यांनी याआधी ५० च्या दशकातल्या फियाट ११०० ची जाहिरात पोस्ट केली होती. या गाडीची तेव्हा किंमत ९,७५० एवढी होती. आजची महागाई गृहीत धरली तर त्याकाळी या गाडीसाठी तब्बल ९,७५० रुपये लोक मोजत होते हे विशेष आहे. 

दिवस पुढे गेले तसे महागाई आणि लोकांचे उत्पन्न दोन्ही वाढले आणि वस्तूंच्या जुन्या किमती आता क्षुल्लक वाटायला लागल्या हेच खरे.

 

आणखी वाचा:

पूर्वी एवढ्या कमी किमतीत मिळायच्या गाड्या... या किमती बघून चक्कर येईल भौ!!

टॅग्स:

Bobhata

संबंधित लेख