किस्से डिजिटल उपकरणांमुळे लागलेल्या शोधाचे: अॅपलवॉचमुळे पडल्या सूनबाईंना बेड्या!!
लेखमालिकेच्या पहिल्या किश्शात मृत व्यक्तीच्या आयवॉचचा वापर करत पोलिसांनी तीच्या खुन्याचा माग कसा काढला हे आपण वाचलं होतं. आजचा किस्साही असाच काहीसा आहे. या प्रकरणातही एका आयफोनच्या मदतीनं पोलिसांनी संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा केला होता.
ही घटना आहे जर्मनीतल्या फ्रिबर्ग शहरात घडलेली. ऑक्टोबर २०१६ मध्ये मारिया लॅदेनबर्गर या १९ वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा बलात्कार करून खून करण्यात आला होता. पार्टीमधून घरी सायकलवरून परतत असताना तिच्यावर हल्ला झाला. तीचा मृतदेह नदीच्या पाण्यात बुडालेला आढळून आला होता.







