नवनवीन गॅजेट्स आपल्या जगण्याचा हिस्सा झाले आहेत. आपले जगणे या गॅजेट्समुळे अतिशय सोपे झाले आहेत, ही गोष्ट कुणीच नाकारणार नाही. पण अनेकांचा या गॅजेट्सवर मुख्य आक्षेप हा असतो की हे गॅजेट्स लोकांना आळशी बनवत आहेत. तसेच यांच्यामुळे लोकांची आजारपणं वाढत आहेत.
या प्रकारचे दावे काही अंशी खरे असले तरी काही गॅजेट्स खूप कामी येतात असं दिसून आलं आहे. यात ऍपल वॉच बऱ्याच वेळा आघाडीवर दिसते. याआधी ऍपल वॉचमुळे कसा खुनाचा छ्डा लागला, तसेच कसे काही गुन्ह्यांचा तपास लावणे सोपे झाले, हे आपण बोभाटावर वाचले आहे.






