बाईक, कार चोरी होणे तसे नेहमीचेच. घरात, ऑफिसात कधी चोरी होईल काय सांगता येत नाही. मोठ्या आकाराच्या गाड्या चोरणे तसे कठीण, पण चोर तेही शक्य करून दाखवतात. पण पुण्याने नविन विक्रम केला आहे.
पुणे आणि पाट्या हे काही नवं प्रकरण नाही. पण कालपासून पुण्यात लागलेल्या एका बॅनरने खळबळ माजवली आहे. या बॅनरच्या म्हणण्यानुसार चक्क आख्खा बस स्टॉप चोरीला गेला आहे. एवढेच नाही, तर जे कोणी हा बस स्टॉप चोरीला गेला या गोष्टीची माहिती देतील, त्यांना ५,००० रुपये इनाम देखील जाहीर झाले आहे.






