९९ स्मार्टफोन्स वापरून त्याने चक्क गुगल मॅप्सला मुर्खात काढलं?

लिस्टिकल
९९ स्मार्टफोन्स वापरून त्याने चक्क गुगल मॅप्सला मुर्खात काढलं?

गुगल मॅप्सचा सुरुवातीचा उपयोग फक्त नकाशा पाहणे एवढाच होता. आता गुगल मॅप्सवर रस्त्यावरचा ट्रॅफिकही दिसतो. ट्रॅफिक किती मोठा आहे हे दाखवण्यासाठी वेगवेगळे रंग वापरलेले असतात. ट्राफिकनुसार त्या रस्त्यावरून प्रवास करायचा की नाही हेही सांगितलं जातं. हे फिचर उपयोगाचं असलं तरी किती भरवशाचं आहे? आज जी बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती वाचून तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडेल.

सिमोन विकर्ट या जर्मन कलाकाराने चक्क गुगल मॅप्सला गोंधळात पडायची योजना आखली होती. त्याने 99 स्मार्टफोन्स घेतले, त्यांचं लोकेशन ऑन केलं आणि त्यांना एका छोट्या हातगाडीवर ठेववून तो निघाला. ट्राफिकमध्ये गाड्या ज्या गतीने सरकतात तसा तो हातगाडी ओढत चालत होता. हे घडलं जर्मनीची राजधानी बर्लिनच्या मुख्य रस्त्यावर. गम्मत म्हणजे ह्याच रस्त्यावर गुगलचं ऑफिस आहे.

एकाचवेळी एकाच रस्त्यावरुन ९९ स्मार्टफोन पुढे सरकत आहेत ही माहिती जेव्हा गुगल मॅप्सला समजली तेव्हा गुगल मॅप्सचा गोंधळ उडाला. परिणामी त्या संपूर्ण रस्त्यावर ट्रॅफिक नसूनही प्रचंड ट्रॅफिक असल्याची माहिती गुगल मॅप्सकडून देण्यात आली.

सिमोनने आपल्या युट्युब चॅनेलवर  हा सगळा प्रकार दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

हा गोंधळ काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला गुगल मॅप्सची कार्यप्रणाली माहित असणं गरजेचं आहे.

गुगल मॅप्स काम कसं करतं?

गुगल मॅप्स काम कसं करतं?

कोणत्या ठिकाणी किती गर्दी आहे हे समजून घेण्यासाठी गुगल मॅप्स गाड्यांमध्ये असलेल्या फोन्सची मदत घेतं. या फोन्सचं लोकेशन ऑन असलं पाहिजे. त्या ठिकाणी किती स्मार्टफोन्स आहेत आणि ते किती गतीने पुढे सरकत आहेत यावरून तिथला ट्राफिक ठरवला जातो. जर गती  फारच  हळुवार असेल तर लाल किंवा गडद लाल (मरून) रंगात ट्राफिक दाखवला जातो. 

व्हिडीओमध्ये गुगल मॅप्सचा गोंधळ स्पष्ट दिसत असला तरी सिमोनने केलेला हा प्रयोग खरोखर घडला आहे याची  शाश्वती देता येत नाही. कारण सिमोनने संपूर्ण माहिती दिलेली नाही. कदाचित हा संपूर्ण बनाव असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गुगल मॅप्स अधूनमधून असा गोंधळ घालतच असतं, त्यामुळे आपल्याला लगेच विश्वास बसूही शकतो. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियातील एका तरुणाला गुगल मॅप्सने १५ मिनिटांचा शॉर्ट कट दाखवून २ तास प्रवास करायला लावला होता. तरी गुगल मॅप्सवर पूर्णपणे अविश्वास दाखवणेही चुकीचं आहे.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख