हिना, काईट, जेली, लूसी, लवली, वीर आणि जेसी यांचा नुकताच निरोप समारंभ झाला. ते त्यांच्या नोकरीतून रिटायर झाले. आता तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? विशेष हे आहे की ही सगळी कुत्र्यांची नावे आहेत.
कुत्र्यांच्या सेवानिवृत्तीचा जंगी कार्यक्रम...सीआयएसएफने केला या छोट्या सैनिकांना सलाम !!


सीआयएसएफने या आठवड्यात दिल्लीत दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन सोबत काम करणाऱ्या कुत्र्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित केला होता. गेल्या ८ वर्षापासून यशस्वी सेवा निभावणाऱ्या ७ पोलीस कुत्र्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. हे खरे खुरे हिरो आहेत मंडळी!! अत्यंत खडतर ट्रेनिंग पूर्ण करून त्यांची निवड झालेली असते. लोकांना सुरक्षित ठेवण्यात ते महत्वाची भूमिका बजावत असतात.

त्यांची कारकीर्द साजरी करावी म्हणून सीआयएसएफने जंगी कार्यक्रम आयोजित केला होता. या रिटायर होणाऱ्या श्वानपथकाला मेडल्स, सन्मानचिन्हे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कदाचित हा इतिहासातला पहिलाच कुत्र्यांचा निरोप समारंभ असेल. या कार्यक्रमाला अनेक अधिकारीसुद्धा उपस्थित होते. निवृत्तीनंतर त्या कुत्र्यांना फ्रेंडकॉस या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या एनजीओकडे सुपूर्ता करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी आम्ही चेन्नईमधली एक कुत्री कशी आरपीएफला मदत करत आहे याची गोष्ट तुम्हाला सांगितली होती. आजची ही गोष्ट कुत्र्यांच्या सन्मानाची आहे.
लेखक : वैभव पाटील
आणखी वाचा :
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१