नाझिया नसीम, कौन बनेगा करोडपती सिझन १२ च्या १ कोटी जिंकणाऱ्या पहिल्या विजेत्या ठरल्या आहेत. खेळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर त्यांनी पहिल्यांदा लाईफ लाईनचा वापर केला. १ कोटीचा प्रश्न हा त्यांच्यासाठी अतिटतीचा होता. या अवघड प्रश्नावर त्यांना उत्तर सुचेनासं झाल्यावर त्यांनी प्रश्न बदलायचा पर्याय निवडला. आज आपल्या लेखाचा विषय त्याच प्रश्नाबाबत आहे. आधी तो प्रश्न जाणून घेऊया.
“अंतराळात तसेच पृथ्वीवरील सर्वात खोल असणाऱ्या मॅरीयाना ट्रेंच मध्ये जाणारी पहिली महिला कोण होती?” हा प्रश्न बघून तुम्हाला समजलं असेलच की तो १ कोटी रुपयांसाठी का विचारण्यात आला होता. असो, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ‘कॅथरीन सुलीवन’.










