नाशिक म्हटले म्हणजे डोळ्यांसमोर येते द्राक्षांची शेती. द्राक्ष शेतकरी आता परदेशात पण द्राक्ष पाठवायला लागले आहेत. नाशकातील द्राक्ष शेतीने कित्येक शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. पण याच नाशिकमध्ये सफरचंदाची शेती येऊ घातली आहे, असे सांगितले तर??
सफरचंद पिकते जम्मू आणि काश्मीरमध्ये तर नाशिक आहे महाराष्ट्रात मग हे कसे शक्य आहे? एका धडपड्या शेतकऱ्याच्या मेहनतीचा परिणाम म्हणून ही गोष्ट प्रत्यक्षात उतरत आहे. सटाणा तालुक्याच्या आखातवाडे या गावातील शेतकरी पंढरीनाथ ह्याळीज यांनी हा चमत्कार केला आहे.





