अमेरिका, रशिया, चायना नाही तर या आहेत ५ जागतिक महासत्ता!!

लिस्टिकल
अमेरिका, रशिया, चायना नाही तर या आहेत ५ जागतिक महासत्ता!!

गेल्या काही वर्षात महासत्ता या शब्दाची व्याख्याच बदलली आहे. एकेकाळी अमेरीका- रशिया यांची सत्ता होती. नंतरच्या काळात चीन महासत्ता होण्याची स्वप्ने बघत होता. अधूनमधून तेल पुरवणारी राष्ट्रे  स्वतःला महासत्ता समजत होती, पण गेल्या काही काळात सत्तेची व्याख्या आणि समिकरणे बदलली आहेत. आता उदायास आलेल्या पाच महासत्ता म्हणजे अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, गूगल, अ‍ॅमेझॉन, फेसबुक !!

विश्वास बसत नसेल तर काही सर्वेक्षणांचे नमुने आणि आकडेवारी बघा !

१. एका सर्वेक्षणानुसार अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, गूगल, अ‍ॅमेझॉन, फेसबुक या कंपन्यांची शेअरबाजारातील एकत्र किंमत वॉलमार्ट -टेस्ला- जे पी मॉर्गनसारख्या मोठ्या २७ कंपन्यांच्या बरोबरीची आहे.

२. अ‍ॅपल या एकाच कंपनीचा गेल्या तीन महिन्यातला नफा अमेरीकेतील ५ मोठ्या एअरलाइन्सच्या कोवीडपूर्व काळातल्या वार्षिक नफ्याइतका आहे.

३. जेफ बेझॉसच्या अ‍ॅमेझॉनच्या जोरावर इतका श्रीमंत झाला आहे, की २० कोटी लोकांना अ‍ॅपलचे लेटेस्ट फोन त्याने मोफत वाटले तरी तो अब्जाधीशांच्या यादीतच असेल.

४. अमेरीकेतल्या जनतेने गेल्या महिन्याभरात जो खर्च पेट्रोलवर केला आहे तितका पैसा म्हणजे ५० बिलीयन डॉलर गूगलने जाहिरातीच्या मार्फत गेल्या तीन महिन्यात गोळा केला आहे.

५. झूमची तुम्हाला वेगळी ओळख करून द्यायला नको. गेल्या दिड वर्षात आपण बरीचशी कामं झूमवरच केली आहेत, पण LinkedInची उलाढाल झूमच्या चौपट आहे. LinkedIn हा मायक्रोसॉफ्टचा साइड बिझीनेस आहे.  

६. तेल विहीरी खणून त्यातून क्रूड ऑइल म्हणजे कच्चे तेल काढायला जितका पैसा एक्झॉनसारख्या लागतो तितकाच पैसा 'अ‍ॅपल' काँप्युटर हब्ज आणि ऑफीस उभी करण्यात या वर्षभरात खर्च करणार आहेत.

७. गेल्या एका वर्षात अ‍ॅमेझॉनचा गल्ला १०९ बिलीयन डॉलर होता. अमेरीकेतल्या सगळ्यात मोठ्या मॉलकंपनीला म्हणजे वॉलमार्टला हा आकडा गाठायला तब्बल ९ वर्षे लागली होती. 

आता शेवटचा एक महत्वाचा प्रश्न : यांच्या हातात इतकी सत्ता दिली कोणी ?

उत्तर फारच सोपे आहे - तुम्ही आम्ही सर्वांनी!

दु:खाची गोष्ट अशी की यापैकी एकही कंपनी भारतीय नाही, पण या कंपन्या भारतीयांच्या सहभागाशिवाय चालूच शकत नाहीत. येत्या १५ ऑगस्टला आपण ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. पुढच्या २५ वर्षात म्हणजे १५ ऑगस्ट २०४७ पर्यंत अशीच एखादी महासत्ता आपण उभी करू शकतो का? तुम्हाला काय वाटते ?

टॅग्स:

amazon

संबंधित लेख