पावसाळा म्हणलं की धो धो पडणारा पाऊस, हिरवागार निसर्ग आणि उंचच उंच घाटमाथ्यावरून पडणारे धबधबे आठवतात. पावसाळ्यात हे धबधबे पाहणे ही एक पर्वणीच असते. अशाच एका नवीन धबधब्याचा शोध नुकताच लागला आहे. तेलंगणाच्या आसिफाबादमध्ये वनाधिकाऱ्यांनी हा नवा धबधबा शोधला आहे. या नव्या धबधब्याच्या शोधामुळे पर्यटकांना अजून एक सुंदर पॉईंट बघता येणार आहे.
चला तर सविस्तर जाणून घेऊया.
वनाधिकाऱ्यांनी तेलंगणाच्या आसिफाबादमध्ये सुमारे ६० मीटर वाहणारा धबधबा दिसला. हा धबधबा असिफाबादच्या गिनधारी (Ginnedhari) वनक्षेत्रात आहे. या वनक्षेत्रात अनेक धबधबे आढळतात. तिथल्या लोकप्रिय अशा गुंडाळा धबधब्यापासून सुमारे २ किमी अंतरावर हा नवा धबधबा आहे. याला बायसन असे नाव देण्यात आले आहे. बायसन धबधब्याच्या माथ्याशेजारील एक विशाल खडक पाहून नाव निवडण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्थानिकांना असा धबधबा आहे याची काही माहिती नव्हती.




