जगातल्या सर्वोच्च शिखराची म्हणजे माऊंट एव्हरेस्टची उंची अजून वाढली! हे वाचून धक्का बसला ना? नुकतच एका नवीन सर्वेक्षणातून आकडेवारी समोर आली आहे. माऊंट एव्हरेस्टची उंची ८,८४८.८६ मीटर्स असल्याचं नेपाळ आणि चीनने एकत्रितपणे जाहीर केलंय.
एव्हरेस्टची समुद्रसपाटीपासूनची सध्याची उंची ८,८४८.८६ मीटर असल्याची दोन्ही देशांनी मंगळवारी (८ डिसेंबर, २०२०) रोजी जाहीर केले आहे. "सर्व्हे ऑफ इंडिया" ने १९५४ साली केलेल्या मोजणीनुसार ही उंची ८,८४८ मीटर होती. या उंचीमध्ये शिखरावरचं बर्फाच्छादित टोकही (Snow Cap) मोजण्यात आलंय.








