मोबाईल फोन्सचे नंबर, गाडीची नंबर प्लेट यासाठी पसंतीचा, अगदी खास नंबर घेण्याची हौस सर्रास पाहायला मिळते. अनेक नेत्यांचे काही नंबर ठरलेले असतात. तेच त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवर असतात किंवा ते मग मोबाईल नंबरचे शेवटचे आकडे असतात.
हे पसंतीचे नंबर घेण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात हे सगळ्यांना माहीत आहे. पण असाही एक नंबर आहे जो चक्क लिलाव होऊन विकला गेला आहे. आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा झाली आहे.






