भारतात आजही मोठी लोकसंख्या खेड्यात राहते. भारताच्या जडणघडणीत खेड्यांचे योगदान महत्वाचे आहे!!... जगभरातून विकासासाठी महत्वाचे पाऊल उचलले जात आहेत. प्युमा कंपनीसुद्धा या कामात आता मोठा हातभार लावायला जात आहे. गुंज फाऊंडेशन सोबत प्युमा एक प्रकल्प घेऊन येत आहे. अर्थव्यवस्थेचे चक्र फिरते रहावे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. येत्या 22 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. काय आहे हा प्रकल्प? चला जाणून घेऊया...
प्युमा जुन्या वस्तू घेऊन गिफ्ट व्हाऊचर देईल आणि त्या वस्तूंचा असा सदुपयोग करतील!!


या प्रकल्पाद्वारे प्युमा लोकांना त्यांचे जुने कपडे आणि बूट, चप्पल जवळच्या प्युमा स्टोरवर जमा करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. आपल्याकडे असे प्रयोग बरेचदा झाले आहे 'माणुसकीची भिंत' हा पण असाच एक प्रयोग ज्यांना गरज नसेल त्यांनी ठेवून जा, आणि ज्यांना गरज आहे त्यांनी घेऊन जा, हा तो प्रयोग, पण प्युमाचा प्रकल्प थोडा वेगळा आहे !! कसे ते पुढे कळेलच!
मंडळी आपल्याकडे असे बरेच कपडे, आणि बूट चप्पल असतात ज्यांचा वापर आपण बंद केला असतो पण घराच्या अडगळीत ते जागा बळकावून बसले असतात. आता त्याच बिनकामाच्या वस्तू तुमच्यासाठी फायद्याच्या ठरणार आहेत.

हा प्रकल्प नेमका काय आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुमच्या जवळच्या कुठल्याही प्युमा स्टोरवर जाऊन जुने कपडे, बूट, चप्पल जमा करावे किंवा तुमच्याजवळपास कुठे प्युमा स्टोर नसेल तर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुमची जवळचे पिकअप पॉईंट निवडू शकता. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या वस्तू जमा करू शकतात. या बदल्यात प्युमा कडून तुम्हाला एक गिफ्ट व्हऊचर मिळेल. ते दाखवून तुम्ही प्युमाच्या वस्तूंवर 20% डिस्काउंट मिळवू शकता. आहे ना भन्नाट आयडीया?

जुन्या वस्तू घरात पडून राहण्यापेक्षा किंवा फेकून देण्यापेक्षा त्यांचा असा उपयोग कधीही चांगला नाही का?
तुम्ही म्हणाल तुम्ही जमा केलेल्या वस्तूंचे प्युमा काय करेल? तर हा सगळा सामान गुंज फाऊंडेशनकडे जमा करण्यात येईल. ते त्यावर प्रक्रिया करतील. आणि सगळे व्यवस्थित करून तो सामान खेड्यांतील शाळांमध्ये किंवा जिथे नैसर्गिक आपत्ती आहे अश्या ठिकाणी देण्यात येतील.
तर मंडळी या कामात तुम्ही पण होईल तेवढे योगदान नक्की द्या.
लेखक : वैभव पाटील.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१