एखादा व्यक्ती खूप जास्त झोपत असेल तर आपण तिला कुंभकर्ण म्हणतो. ही जास्तीची झोप तशी २-४ तास असते. पण राजस्थानात एका व्यक्तीने झोपेचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.
राजस्थानातील राजौर जिल्ह्यात पुरखाराम नावाचे ४२ वर्षीय व्यक्ती आहेत. ते थोडेथोडके नव्हे, तर वर्षातील तब्बल ३०० दिवस झोपलेले असतात. याच कारणाने त्यांना सगळीकडे कुंभकर्ण म्हणून ओळखले जाते.
पुरखाराम आराम किंवा आळस म्हणून झोपत नाहीत. त्यांना एक दुर्मिळ असा आजार आहे. एक्सीस हायपरसोम्निया (Axis hypersomnia) असे त्या आजाराचे नाव आहे. या आजारात माणूस नेहमी झोपेत असतो. विचित्र गोष्ट म्हणजे पुरखाराम आपली सर्व दैनंदिन कामे ते झोपेत असतानाच पार पाडत असतात.





