गदर सिनेमा आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल. सिनेमाची कथा भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या काळातली आहे. एक मुस्लीम मुलगी आपल्या कुटुंबापासून हरवते. एक शीख माणूस तिला आसरा देतो. पुढे दोघांत प्रेम होतं. दोघं लग्न करतात. मग एके दिवशी ती आपल्या कुटुंबाकडे, पाकिस्तानात जाते आणि गोष्टी बदलतात.
हीच कथा शहीद-ए-मोहब्बत बूटा सिंह या पंजाबी सिनेमात आली आहे आणि साधारण याच वळणाने जाणारी कथा वीर झारा सिनेमातही येते. याचं कारण काय असावं? गदरची कथा या दोन सिनेमांनी चोरली असं वाटण्यास इथे जागा आहे, पण खरे तर हे तिन्ही सिनेमे एका खऱ्या कथेवरून प्रेरित आहेत.
व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आम्ही ह्या खऱ्याखुऱ्या कथेला घेऊन आलो आहोत. ही कथा सिनेमातल्या कथेप्रमाणे सुखांत कथा नाही. ही कथा वाचून मनाला नक्कीच चटके बसतील.












